व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2024 असा करा अर्ज

मतदार ओळखपत्र म्हणजेच Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे आणि या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. यामुळे तुम्हाला अनेक वेळा कार्यालयात जावे लागण्याची गरज नाही. कारण, एक सोपा आणि सुलभ मार्ग उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला मतदार ओळखपत्र मिळवता येईल.

मतदार ओळखपत्र का महत्वाचे आहे?

निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात.

हे वाचा-  HDFC Bank Personal Loan घर बसल्या अर्ज करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्राइविंग लाइसेंस
  • पासपोर्ट
  • मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे (इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५)
  • जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला

घरबसल्या मतदान ओळखपत्र मिळवा

मतदार कार्डद्वारे तुम्ही मतदान करण्याचा हक्का बजावू शकता, याशिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर करू शकता. पूर्वीच्या काळी मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लोकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागायच्या. पण, आता हे काम तुम्ही आता घरी बसून करू शकता. निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तुमचे मतदार कार्ड लवकर बनवा.

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला नवीन यूजर पर्याय निवडावा लागेल आणि लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. यासोबतच, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेले संबंधित कागदपत्रे आणि फोटो अपलोड करावे लागतील. सर्व भरलेले तपशील काळजीपूर्वक तपासा आणि सर्व तपशील तपासल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

हे वाचा-  रेशन कार्ड ई-केवायसी कसे करावे: फक्त 5 मिनिटांत रेशन कार्ड ई-केवायसी कसे करावे, येथे सोपा मार्ग जाणून घ्या

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment