व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

PM किसानचा 18 वा हप्ता कधी मिळणार? तत्पूर्वी ही तीन कामे पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत

PM Kisan Nidhi : देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदा पीएम किसान PM Kisan Scheme) योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच आता देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यामुळे 18 वा हफ्ता (PM Kisan 18th Instalment) मिळणार की नाही याबाबत सांशकता होती मात्र आज पंतप्रधानांनी पहिलीच स्वाक्षरी करून शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे.

यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. त्यानुसार 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या हप्त्याशी संबंधित फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. यामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20000 कोटी रुपयांचे वितरण होईल.

कधी मिळणार हफ्ता

दरम्यान पी.एम.किसान योजनेचा 18 वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे ई-केवायसी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 18 वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

हे वाचा-  शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळत आहे 90% अनुदान, असा करा अर्ज

9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ

मोदी यांनी या योजनेच्या 18 व्या हफ्त्याला मंजुरी दिल्यामुळे साधारण 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2000 रुपये येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 18 वा हफ्ता आला होता

हप्ता मिळण्यापूर्वी ही तीन कामे पूर्ण करा

1) ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी केली नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन हे करु शकतात. ई-केवायसी पूर्ण केली असेल तरच पैसे जमा होतील अन्यथा तुम्हाला 18 वा हप्ता मिळणार नाही.

2) तसेच तुम्हाला जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा 18 वा हप्ता अडकू शकतो. यासाठी तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊ शकता.

3) बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा 18 वा हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

हे वाचा-  आता शेतकऱ्यांसाठी मिळणार मिनी ट्रॅक्टरवर 90% अनुदान असा करा अर्ज, Mini Tractor Yojana Subsidy Online Apply

कधी जमा होणार PM किसानचा 18 वा हप्ता?

पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हफ्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान पीएम किसान योजनेचा 18 वा हफ्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेचा 18 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment