व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

भारतातील 5 सर्वोत्तम पर्सनल लोन ॲप्स: कमी वेळेत आणि कमी कागदपत्रांमध्ये लोन मिळवा

नमस्कार मित्रांनो, आज आपण आर्थिक गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्सनल लोन ॲप्सबद्दल चर्चा करू. आर्थिक विषय नाजूक असतो विशेषत जेव्हा कर्जाची आवश्यकता येते. कर्जे घेणे आता सामान्य बाब झाली आहे, कारण लग्न, गाडी, घर, शिक्षण, व्यवसाय अशा अनेक गोष्टींसाठी लोक कर्ज घेण्याचा विचार करतात. पूर्वी बँका, पतसंस्था किंवा सोसायटींकडून कर्ज मिळवणे खूप अवघड असायचे. मात्र आता पर्सनल लोन देणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत ज्यामुळे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. चला तर मग, भारतातील सर्वोत्तम पाच इन्स्टंट लोन देणारी ॲप्स कोणती आहेत ते पाहू.

धनी (Dhani) App

धनी लोन अँड सर्विस लिमिटेड ही कंपनी ग्राहकांना लोन सेवा पुरवते. सुरुवातीला ही कंपनी वैयक्तिक लोन पुरवण्यात कमी प्रसिद्ध होती, परंतु गेल्या काही वर्षांत तिने वैद्यकीय कर्ज, लग्नासाठी कर्ज, वाहन कर्ज यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, गृह कर्ज देण्याची सेवा ही कंपनी पुरवत नाही.

हे वाचा-  फक्त आधार कार्ड देऊन मिळेल खराब सिबिल स्कोअरवर सुद्धा 25000 पर्यंतचे तातडीचे कर्ज, Low Cibil Score Loan up to 25000.

धनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवते. हे ॲप विशेषतः वैयक्तिक कर्ज पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. धनी कडून वैयक्तिक कर्ज हे ग्राहकाच्या सिबिल स्कोरच्या आधारावर दिले जाते. धनी त्यांच्या ॲपद्वारे पात्र व्यक्तींना त्वरित किंवा जलद वैयक्तिक कर्ज देते. या मोबाईल ॲपद्वारे 1000 ते 15 लाख रुपये पर्यंत लोन घेता येते.

व्याजदर 13.99% पासून सुरु होतो.धनी ॲपद्वारे कर्ज मिळवण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. हे कर्ज तीन ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते, परंतु वेळेत कर्जाची परतफेड करणे अत्यावश्यक आहे. वैयक्तिक कर्जाबरोबरच धनी या वेबसाईटवर किराणा, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, घर सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ‘शॉप नाव पे लेटर’ ची सुविधा उपलब्ध आहे.

बजाज फायनान्स (Bajaj Finance) App

बजाज फायनान्स ही एक भारतीय कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय पुण्यात आहे. या कंपनीच्या 294 पेक्षा जास्त ग्राहक शाखा आहेत. बजाज फायनान्स आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज पुरवते. त्यात इलेक्ट्रॉनिक उत्पादने, गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, आरोग्य कर्ज, वाहन कर्ज इत्यादी गोष्टींसाठी वैयक्तिक कर्जांचा समावेश आहे.

बजाज फायनान्सकडून 35 लाख रुपयांपर्यंत तत्काळ वैयक्तिक कर्ज उपलब्ध आहे. या कर्जासाठी 11% पासून व्याजदर सुरु होतो. कर्जासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोर 500 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. कर्जाची रक्कम मंजुरीनंतर 24 तासांत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. बजाज फायनान्सकडून 84 महिन्यांपर्यंत कर्जाची मुदत दिली जाते. अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 21 ते 67 वर्ष आहे.

होम क्रेडिट (Home Credit) App

होम क्रेडिट ॲप आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहाय्य पुरवते. ही ॲप्लिकेशन डिजिटल पद्धतीने कर्ज प्रक्रिया पूर्ण करते त्यामुळे अर्ज करताना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नसते.

या ॲपद्वारे ₹5 लाखांपर्यंत कर्ज मिळवता येते. अर्जाची प्रक्रिया जलद असल्यामुळे कर्जाची रक्कम तातडीने बँक खात्यात जमा होते.

हे वाचा-  5 मिनिटांत मिळवा वैयक्तिक कर्ज | बँकेने नाकारले तरीही दिलासा!

एअरटेल पेमेंट बँक (Airtel Payment Bank) App

एअरटेल पेमेंट बँक ही आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या ॲपद्वारे घरबसल्या कर्ज मिळवता येते. ₹50,000 पर्यंत कर्जाची रक्कम सहज मिळते आणि ती फक्त 5 मिनिटांत बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

एअरटेल पेमेंट बँक कर्जाची परतफेड 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीत करता येते या कर्जाचा व्याजदर 9% ते 15% पर्यंत असतो. कर्ज अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते स्टेटमेंट आवश्यक असते.

एचडीएफसी बँक (HDFC Bank) App

एचडीएफसी बँक सुद्धा पर्सनल लोन देण्यासाठी अग्रेसर असते. जर ग्राहक एचडीएफसी मध्ये नवीन असेल तर त्याला एचडीएफसी कडून चार तासापेक्षा कमी वेळेत इन्स्टंट पर्सनल लोन मिळू शकते. पण जर एचडीएफसी चा विद्यमान ग्राहक असेल आणि त्याला पर्सनल लोन हवे असेल तर ते केवळ अवघ्या दहा सेकंदात उपलब्ध होऊ शकते. पण जे विद्यमान ग्राहक नाहीत त्यांना मात्र चार तास हा कालावधी लागू शकतो. एचडीएफसी बँकेत कर्ज घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी फार कमी कागदपत्राची आवश्यकता असते ज्याद्वारे हे कर्ज सहज रित्या उपलब्ध होऊ शकते व अर्जही सहजरित्या होऊ शकतो.एच डी एफ सी मध्ये पर्सनल लोन हे कमीत कमी पाच हजार रुपये पासून जास्तीत जास्त 40 लाख रुपये पर्यंत मिळू शकते.

हे वाचा-  CIBIL स्कोअर चांगला असणे का महत्वाचे? जास्त पगार असूनही कर्ज देण्यास नकार देते बँक

एचडीएफसी चा वैयक्तिक कर्ज व्याजदर हा 10.75 ते 21.50% आहे. त्याचबरोबर एचडीएफसी थकीत ईएमआय दर दोन टक्के प्रति महिना आकारते.

एचडीएफसी वैयक्तिक कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी किमान 12 महिने आणि जास्तीत जास्त साठ महिने चा कालावधी बँकेकडून दिला जातो.

एचडीएफसी वैयक्तिक कर्ज हे शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर बांधण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी घेऊ शकतात. हे लोन मिळवण्यासाठी अर्जदाराला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जमा करण्याची ही गरज नाही एचडीएफसी बँक ही आपल्या ग्राहकांना विमा संरक्षण ही देते.

वैयक्तिक कर्जासाठी 21 ते 60 वर्षे वयोगटातील अर्जदार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे 25 हजार रुपये असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे जेणेकरून एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्ज बिन शर्त देऊ शकेल. अर्जदार हा कोणत्याही ठिकाणी दोन वर्षे कालावधीसाठी काम करत असावा.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment