व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Online Land Map: ‘ही’ पद्धत वापरा आणि जमिनीचा नकाशा पहा सेकंदात! वाचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

हे वाचा-  अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकारजमा: कोण तक्रार दिली तर परत घेणार

ई-नकाशा प्रकल्प काय?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला आहे.

या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.

जमिनीचा नकाशा पाहणे :

मालमत्ता विकत घेताना मालमत्तेचा इतिहास पाहण्यासाठी, शेत-जमिनीतून वाट काढण्यासाठी तसेच संबंधित जमिनीची हद्द कुठपर्यंत आहे या सर्व बाबतीत त्या जागेचा नकाशा पाहणे जरूरीचे बनते. हीच प्रक्रिया आता शासनाने सुलभ आणि विनाशुल्क केली आहे. घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरून तुम्ही भू-नक्षा पाहू शकता.

अशा पद्धतीने ऑनलाइन पहा तुमच्या गावचा नकाशा

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर mahabhunakasha.mahabhumi.gov.in या लिंक ला क्लिक करावे लागेल व त्यानंतर ही लिंक ओपन होईल. ही लिंक ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक पेज दिसेल व त्याच्या डाव्या बाजूला लोकेशन

हे वाचा-  सुकन्या योजनेत मिळतील 65 लाख रु. : मुलीच्या नावे असे उघडा खाते

2- तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडावा आणि ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा पर्याय निवडावा.

3- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचा पर्याय निवडावा.

4- हे पर्याय निवडल्यानंतर व्हिलेज मॅप या पर्यायावर जावे.

5- या पर्यायावर गेल्यानंतर पुढे प्रोसेस करावे.

6- त्यानंतर डाव्या बाजूच्या बटनावर प्लॉट प्रमाणे जमीन शोधता येते.

7- यामध्ये सर्च बाय प्लॉट नंबर या वाक्याचा एक रकाना दिसतो.

हे वाचा-  बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज करा 2024 | संपूर्ण मार्गदर्शक

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment