व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

भारतीय पोस्ट खात्यात 44228 पदांसाठी भरती, पात्रता 10 वी पास पोस्ट ऑफिस भरती 2024: सुवर्णसंधी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय पोस्ट विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या एकूण 44,228 रिक्त जागांसाठी जम्बो भरतीची माहिती देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया 25 जुलै 2024 रोजी सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

भरतीची अधिकृत अधिसूचना

25 जुलै 2024 रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना पोस्ट खात्याकडून जारी करण्यात आली आहे. परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार 25 जुलैपासून तात्काळ अर्ज करू शकतात.

हे वाचा-  पोस्ट ऑफिस आरडी योजना: प्रत्येक महिन्याला ₹500 जमा केल्यावर मिळतील इतके पैसे

विनापरीक्षा थेट भरती

विशेष म्हणजे या भरतीत विनापरीक्षा थेट भरती होण्याची संधी आहे. सदर भरती प्रक्रियेत उमेदवाराची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही दहावीच्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

रिक्त पदांचे नाव

भारतीय पोस्ट खात्यात खालील रिक्त पदे भरली जाणार आहेत:

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

कोण अर्ज करू शकतो?

भारतीय पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी अर्ज करू शकतो. उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच उमेदवाराने दहावी परीक्षेत आपल्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट

भारतीय पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट आहे. आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट आहे.

शेवटची मुदत

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जुलै 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटाची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. तसेच अर्ज संपादित म्हणजेच एडिट करण्याची तारीख ही 6 ते 8 ऑगस्ट 2024 ही आहे.

हे वाचा-  पंतप्रधान स्वानिधी योजना: फक्त आधार कार्डवर ५०,००० बिनव्याजी कर्ज योजना

निवड प्रक्रिया

गुणवत्तेच्या आधारावर भारतीय पोस्ट खात्याच्या ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होईल. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शेवटचा राउंड पार पडल्यानंतर उमेदवाराची निवड होईल.

पगार

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांवर एबीपीएम/जीडीएस पोस्टचा पगार दरमहा 12 हजार ते 24 हजार रुपये इतका असेल. तसेच बीपीएम पदांचा पगार 12 हजार ते 29 हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

परीक्षा शुल्क

‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य वर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लीक करा

भारतीय पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी भरतीची ही सुवर्णसंधी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची एक अद्वितीय संधी देत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करावा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाऊल उचलावे.

हे वाचा-  Union Bank Personal Loan: घरबसल्या मिळवा ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज, असे करा अर्ज

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment