व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

विहीर अनुदान योजना 2025 पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी मोठे अनुदान दिले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य आहे, असे म्हटले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा पात्रता काय आहे अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

विहीर अनुदान योजनेची पात्रता

विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष सरकारने ठरवले आहेत. या निकषांनुसार पात्र लाभार्थींना प्राधान्य दिले जाईल.

  1. अनुसूचित जातीतील शेतकरी
  2. अनुसूचित जमातीतील शेतकरी
  3. भटक्या जमातीतील शेतकरी
  4. विमुक्त जाती
  5. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
  6. स्त्री-कर्ता असलेल्या कुटुंबाचे शेतकरी
  7. विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  8. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  9. सिमांत शेतकरी (2.5 एकरपर्यंत शेतजमीन असलेले)
  10. अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन असलेले)
हे वाचा-  शेतकऱ्यांसाठी पाइपलाइन अनुदान योजना – मोफत पाइपलाइन अनुदान मिळवा 2025

लाभार्थ्यांची पात्रता कशी तपासावी?

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराची पात्रता काही निकषांच्या आधारे ठरवली जाईल अर्जदाराकडे कमीतकमी 1 एकर शेतजमीन असावी सिंचन विहीर खोदण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर अंतर आवश्यक आहे अर्जदाराने सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.

दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराचे बंधन अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांसाठी शिथिल करण्यात आले आहे. अर्जदाराकडे आठ-अ उतारा असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. अर्जदार शेतकऱ्याने अर्ज करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कृषी विभाग कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा. अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर करावा.

ग्रामपंचायत अर्ज जमा करून त्यांची नोंद घेईल. दर सोमवारी अर्ज पेटी उघडली जाईल आणि त्यातील अर्जांची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. तांत्रिक सहाय्यक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने हे कार्य पूर्ण केले जाईल. हे अर्ज मनरेगा अंतर्गत संबंधित तांत्रिक सहाय्यकाद्वारे तपासले जातील.

अर्ज कुठे आणि कसा करावा?

विहीर अनुदानासाठी अर्ज करणारे शेतकरी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करू शकतात. अर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामसेवकाकडे जावे किंवा जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज प्राप्त करावा.

हे वाचा-  नमो शेतकरी योजनेचे ४,००० रुपये लवकरच खात्यात! तुमचे नाव आहे का यादीत?

अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.ग्रामपंचायत ऑफिसमध्ये दर सोमवारी अर्ज पेटी उघडण्यात येते आणि त्यातील अर्ज ऑनलाईन करण्याचे काम ग्रामपंचायत करते. यासाठी ग्राम रोजगार सेवक किंवा डाटा एंट्री ऑपरेटरची मदत घेतली जाते. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायत शेतकऱ्यांना पोचपावती देते.

लाभधारकाची निवड कशी होते?

या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

1.अनुसूचित जाती

2.अनुसूचित जमाती

3.भटक्या जमाती

4.विमुक्त जाती

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment