व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi : घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान |

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 आपण पाहतो की, सध्या दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागत आहे. परंतु कोळशाचे साठे कमी होत आहेत. त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 देशातील नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे विविध योजना देखील सुरू करते. अशीच एक योजना आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ती म्हणजे सोलार रुफटॉप सबसिडी योजना.

Solar Rooftop Subsidy ही योजना केंद्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या स्वतःच्या घरावर सोलर बसवण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकार मार्फत अनुदान दिले जाते. यामुळे राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनी वरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरावर, कार्यालयावर, कारखान्यावर सोलर पॅनल बसवता येईल

हे वाचा-  चुंबकाचा वापर करून वीज चोरी करता येते का पहा | Magnet on electricity meter

सोलर रूफटॉप सबसिडी योजना 2024

Solar Rooftop Subsidy सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत कार्यालये, कारखाने इत्यादींच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यात येणार असून या सौर पॅनेलवर ग्राहकांना अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत 1 किलो वॅट सौर पॅनेल बसविण्यासाठी 10 चौरस मीटर जागेची आवश्यकता असेल आणि सोलर पॅनलचा लाभ 25 वर्षांसाठी घेता येईल. विशेष बाब म्हणजे या योजनेंतर्गत, सोलर पॅनलची किंमत सुमारे 5-6 वर्षात वसूल केली जाईल, त्यानंतर तुम्हाला सुमारे 20 वर्षे मोफत विजेचा लाभ घेता येईल.या योजनेअंतर्गत, सरकार 3 किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यावर 40% अनुदान देईल, तर सोलर रूफटॉप सबसिडी योजनेंतर्गत, जर तुम्ही 500 किलो वॅटपर्यंतचा सोलर रूफटॉप प्लांट बसवला तर तुम्हाला अनुदान मिळेल. 20% पर्यंत.

हे वाचा-  CIBIL Score कसा वाढवायचा | लोणसाठी CIBIL स्कोर किती असावा..

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- सोलर रुफटॉप सबसिडी योजना कोणासाठी आहे?

  • उत्तर:- सोलर रुफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

प्रश्न:- सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज कसा करावा?

  • उत्तर:- सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment