व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सुकन्या योजनेत मिळतील 65 लाख रु. : मुलीच्या नावे असे उघडा खाते

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची महत्त्वाची योजना आहे, जी बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पालक आपल्या मुलीच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतात. या लेखात आपण सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे, खाते उघडण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Sukanya Samruddhi Scheme Benefits : मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची योजना आहे. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत सन 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत कोणताही पालक ज्याच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त नाहीये अशा आपल्या कन्येच्या नावे जवळच्या पोस्टात किंवा अधिकृत बँकेत सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींचे शिक्षण व विवाहासाठी आर्थिक आधार प्रदान करणे आहे. या योजनेद्वारे खातेदारांना 7.6 टक्के चक्रवाढ व्याजदराने व्याज मिळते, ज्यामुळे त्यांच्या बचतीत मोठी वाढ होते.

  • किमान जमा रक्कम: खाते सुरू करताना किमान 250 रुपये भरून खाते सुरू करता येते.
  • कमाल जमा रक्कम: एका आर्थिक वर्षामध्ये किमान 250 रुपये आणि कमाल 1,50,000 रुपये भरता येतात.
  • करमुक्त बचत: या योजनेतून मिळणारे व्याज आणि परतावा दोन्ही करमुक्त आहेत.
  • लांबकालीन बचत: खाते उघडल्यानंतर 15 वर्षे नियमित पैसे भरावे लागतात आणि खाते 21 वर्षानंतर पूर्णपणे मॅच्युअर होते.
  • शिक्षण आणि विवाहासाठी रक्कम: मुलगी 10वी पास झाल्यावर शिक्षणासाठी आणि 18व्या वर्षी विवाहासाठी रक्कम काढता येते.
हे वाचा-  Buddy Personal Loan 2024: बडी ॲप्लिकेशन द्वारे अर्ज करून रु. 10000 ते रु. 15 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • मुलीचे आधार कार्ड (असल्यास)
  • मुलीच्या आई-वडिलांचे आधार कार्ड
  • आई किंवा वडिलांचे पॅन कार्ड (असल्यास)
  • तीन पासपोर्ट साईज फोटो मुलीचे
  • आई-वडिलांचे नवीन खाते उघडण्याचा अर्ज

पोस्टात खाते उघडण्याची प्रक्रिया

तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. बँकांच्या बाबतीत काही ठराविक शाखेतच हे खाते उघडता येते. खाते उघडण्यासाठी खालील प्रक्रिया पाळावी लागेल:

  • अर्ज भरणे: सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक अर्ज भरावा.
  • कागदपत्रांची पूर्तता: आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज सबमिट करावा.
  • प्रारंभिक रक्कम जमा करणे: खाते उघडताना किमान 250 रुपये जमा करावे.
  • खाते सुरु करणे: कागदपत्रांची तपासणी आणि प्रारंभिक रक्कम जमा केल्यानंतर खाते सुरु होते.

सुकन्या समृद्धी योजनेचे नियम व अटी

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडताना खालील नियम व अटी पाळाव्या लागतात:

  • खाते सुरू करताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • खाते उघडल्यानंतर 15 वर्षे पैसे भरावे लागतात.
  • खाते उघडल्यानंतर 21 वर्षानंतर पैसे वापस मिळतात किंवा मुलीच्या लग्न झाल्यावर पूर्ण पैसे मिळतील.
  • जर मुलगी 18 व्या वर्षी लग्न करत असेल तर खाते बंद होईल आणि सर्व पैसे व्याजासहित काढता येतील.
  • मुलगी 10वी पास झाल्यावर शिक्षणासाठी पैसे काढता येतील.
  • मुलगी फर्स्ट ईयरला गेल्यावर 50 टक्के रक्कम काढता येईल.
हे वाचा-  5 kW हायब्रिड सोलर सिस्टम: घरगुती विजेच्या बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय विना बॅटरी रात्रंदिवस चालवा 2 AC हीटर आणि सर्व लोड

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. त्यामुळे आपल्या मुलीच्या नावाने हे खाते उघडून त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेची हमी घ्या.

सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार व्याज ७.६ टक्के ने चक्रवाढ व्याजाने मिळतात.

सुकन्या समृद्धी योजनेची मर्यादा

खातेदार या योजनेअंतर्गत एका वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. ही रक्कम खातेदाराने 15 वर्षांसाठी जमा करणे आवश्यक आहे.जर तुमची मुलगी आठ वर्षांची असेल, तर तुमच्यासाठी या खात्यात 23 वर्षांसाठी किमान गुंतवणूक रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.यानंतर, मॅच्युरिटी कालावधीपर्यंत तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर व्याज मिळत राहील.

18 व्या वर्षी गुंतवणुकीच्या 50 टक्के रक्कम काढता येते

या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यावर 15 वर्षांसाठी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. परंतु मुलगी 18 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर किंवा 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 50% रक्कम काढू शकते. ही रक्कम मुलगी किंवा पालक/कायदेशीर पालक एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये काढू शकतात. परंतु ही रक्कम 1 वर्षातून एकदाच आणि जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी हप्त्यांमध्ये काढता येते.

हे वाचा-  लाडकी बहिण योजनेसाठी घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट

नमस्कार मी ओंकार पाटील (M. Sc) . शाळेत असल्यापासून मला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्याची आवड होती. माझ्या आवडीनुसार मी लेखन करण्याचा निर्णय घेतला, मी काही मराठी वृत्तपत्रांसाठीही लेखन केले आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून काहीशी नवीन आणि उपयोगी माहिती सामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Leave a Comment